मंगळवार, डिसेंबर 5, 2023

आ. भोळे यांनी सुरेशदादांबद्दल केलं मोठं विधान ; सर्वांच्या भुवया उंचावल्या !

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यापासून प्रेरणा घेत देण्याचे काम करत आहे. पिंप्राळ्यात रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकर कामाला सुरुवात होईल, असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले. suresh jain and raju mama bhole

पिंप्राळ्यात गुरुवारी, आषाढी एकादशीच्या रथोत्सवाला माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि आमदार सुरेश भोळे यांनी हजेरी लावली. यावेळी सुरेशदादांनी पिंप्राळ्याच्या विकासासाठी सढळ हस्ते निधी देण्याचे आवाहन आमदार भोळे यांना केले.

पिंप्राळ्याचा रथ नेहमीच आशीर्वाद देत आला असल्याचेही ते म्हणाले. पिंप्राळ्याच्या उत्कर्षासाठी अनेकांनी काम केले. जुना रथ नवीन करायचा होता, त्यावेळी स्थोत्सव समितीचे मोहन वाणी यांनी विनंती केली होती. त्यांना लगेच होकार दिला. सर्वांच्या सहकार्याने नवीन स्थ तयार झाला.

पिंप्राळ्याचा रथ नेहमीच आशीर्वाद देत आला आहे. पिंप्राळ्याची उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक आबा कापसे यांच्या नेतृत्वात प्रगती व्हावी. त्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन सुरेशदादा जैन यांनी केले