⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | रेल्वेचा युटर्न ! सुरत-भुसावळ पॅसेंजरचा मुहूर्त पुन्हा लांबला

रेल्वेचा युटर्न ! सुरत-भुसावळ पॅसेंजरचा मुहूर्त पुन्हा लांबला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । तब्बल अडीच वर्षांनंतर सुरत भुसावळ पॅसेंजर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक गाडी रद्द करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. याबाबतचे पत्र भुसावळ विभागाला प्राप्त झाल्याने रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानतंर रेल्वेकडून विशेष आरक्षित गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र पॅसेंजर गाड्या बंद असलयाने प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते. भुसावळ येथून गेल्या काही महिन्यापूर्वी पॅसेंजर गाड्यांऐवजी मेमू गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यात मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजर बंदच होती. मात्र रेल्वेने ८ जूनपासून सुरत-भुसावळ करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे प्रवाशांची माेठी गैरसाेय दूर होणार होती.

बुधवारी सूरत येथून ही गाडी रात्री 11.10 वाजता सुटणार होती, व दुसर्‍या दिवशी सकाळी 7.55 वाजता भुसावळला येणार होती तर भुसावळ येथून ही गाडी 9 जूनला सायंकाळी 7.30 वाजता सुटून सुरतला दुसर्‍या दिवशी पहाटे 5.15 वाजता पोहोचणार होती व हा नित्यक्रम राहणार होता मात्र अचानक गाडी रद्द करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. याबाबतचे ट्विट सुरत डीआरएम यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.