बीएचआर प्रकरणी सुरज झंवरचा जामीन मंजूर

मे 28, 2021 4:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित सुरज झंवरचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला असल्याची माहिती मिळत असून आदेश प्राप्त होण्यास दोन दिवसांचा अवधी लागणार आहे.

court

बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सुरज झंवर मागील काही महिन्यांपासून पोलीस कोठडीत आहे. सुरज झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने विविध बँकांना सुरज झंवर व कुटुंबियांच्या बँक खात्यांची माहिती घेण्यासाठी तसेच ती खाती गोठविण्यासाठी काही बँकांना पत्र दिले होते.

पुणे न्यायालयात सरकारी वकील ऍड.प्रवीण चव्हाण यांनी सुरजच्या जामीन अर्ज विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता सुरज हा मुख्य सूत्रधार असून त्याच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र लॅपटॉप सापडले आहेत तसेच मालमत्ता विकणे मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी ऍड.चव्हाण यांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले होते. त्यांनी जामीन फेटाळला होता.

काही दिवसांपूर्वी सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाने  झटका दिला होता. मला देण्यात आलेली नऊ दिवसांची पोलीस रिमांड बेकायदेशीर असल्याबाबत निकाल द्यावा, अशी सुरजची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत अर्जात तथ्य नसल्याचे सांगून योग्य त्या न्यायालयात दाद मागण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या.

सुरज झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now