केंद्र सरकारला झटका ! सुप्रीम कोर्टाचा नवीन UGC नियमांना स्थगिती

जानेवारी 29, 2026 4:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुप्रीम कोर्टाने नवीन UGC नियमांना स्थगिती दिली आहे. UGC च्या नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं आहे. त्यामुळे UGC चे 2012 मधीलच नियम लागू राहणार असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि यूजीसीला नोटीस बजावून १९ मार्च २०२६ पर्यंत उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.

suprim court

उच्च शैक्षणिक संस्थांमधील जातीय भेदभाव संपवण्यासाठी यूजीसीने नियमांमध्ये बदल केले आहेत. यूजीसीच्या नवीन नियमांवरुन देशभरात गदारोळ सुरु होता. दरम्यान यूजीसीच्या नवीन नियमाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने UGC ने जे नवीन नियम बनवले होते, त्यावर स्थगिती दिली आहे. सुनावणीनंतर आता यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन २०२६ वर स्थगिती दिली आहे. जुने २०१२ चे नियम लागू राहतील, असं त्यांना म्हटलं आहे.

Advertisements

सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?
सरन्यायाधीश यांनी म्हटलं की, नियमांची भाषा अस्पष्ट आहे. तज्ज्ञांनी त्यांनी भाषा सुधारण्यासाठी त्याची तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरुन त्याचा गैरवापर होऊ नये. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा विचार करा, जेणेकरुन समाज कोणत्याही भेदभावाशिवाय विकसित होऊ शकेल.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now