पाचोऱ्यामध्ये भाजपला धक्का ! आमदार किशोर पाटलांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी

डिसेंबर 21, 2025 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचे निकाल पुढे येत असून पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून, येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. तर दुसरीकडे भडगाव येथेही शिवसेना शिंदे गटाच्या रेखा मालचे यांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

pachora

निवडणुकीआधीच पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढेल अशी घोषणा आमदार किशोर पाटील यांनी केली होती. भाजपने देखील ‘एकला चलो रे’ चा नारा देत आमदार किशोर पाटलांविरोधात चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण दंड थोपटले होते.

Advertisements

किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उभ्या होत्या. तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप वाघ यांची पत्नी सुचेता वाघ या भाजपकडून उभ्या होत्या. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती.

Advertisements

दरम्यान आज जाहीर होत असलेल्या निकालात पाचोरा पालिकेवर शिंदे गटाने दणदणीत विजयी मिळवीत नगरपालिकेवर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. पाचोरा नगरपालिकामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता किशोर पाटील विजयी आहे. . त्यांच्या विजयाने समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील प्रभागनिहाय निकाल

प्रभाग क्रमांक १ मध्ये अ आणि ब या दोन्ही जागांवर शिवसेना शिंदेगटने विजय मिळवला आहे. प्रभाग १-अ मधून मनिषा सुरेंद्र बाविस्कर यांनी तर प्रभाग १-ब मधून किशोर गुणवंत बारावकर यांनी विजय संपादन करत शिंदेगटची विजयी सुरुवात केली.

प्रभाग क्रमांक २ मध्येही शिवसेना शिंदेगटचा प्रभाव कायम राहिला असून, २-अ मधून संजय नाथालाल गोहिल आणि २-ब मधून वैशाली छोटुलाल चौधरी यांनी विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ गटातून भारतीय जनता पक्षाच्या कविता विनोद पाटील यांनी विजय मिळवत भाजपचे खाते उघडले, तर ब गटातून शिवसेना शिंदेगटचे सतीश पुंडलिक चेडे यांनी बाजी मारली.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेना शिंदेगटने पुन्हा आपली ताकद सिद्ध केली असून, ४-अ मधून रफिक गफ्फार बागवान आणि ४-ब मधून शेख रशीदाबी शब्बीर यांनी विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्येही शिवसेना शिंदेगटचा झेंडा फडकला असून, ५-अ मधून खनसा सलीम बागवान आणि ५-ब मधून संजय त्र्यंबक चौधरी यांनी विजयी होत मतदारांचा विश्वास संपादन केला आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये अ आणि ब दोन्ही जागांवर शिवसेना शिंदेगटचे उमेदवार विजयी झाले आहेत. ६-अ मधून रहेमान बिस्मिल्ला तडवी आणि ६-ब मधून प्रांजल सुमित सावंत यांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवला असून, या प्रभागातही शिंदेगटचा दबदबा कायम राहिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now