सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांनो अशा प्रकारे ठेवा पक्षांना शेतापासून दूर
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । जिल्ह्यात सूर्यफुलाचे क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून वाढत जात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे सूर्यफुलाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. मात्र पक्ष्यांच्या त्रासामुळे सूर्यफूल लागवड करणारे शेतकरी बेहाल झाले आहेत. जिल्ह्यात आधीच तेलबियांचे क्षेत्र कमी आहे. त्यात पक्ष्यांच्या त्रासामुळे सूर्यफूल उत्पादकांना होत असलेल्या त्रासामुळे अनेक शेतकरी इच्छा असूनही सूर्यफूल लागवडीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
सिंचनासाठी अधिक पाणी, मजूर न मिळणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, पक्ष्यांचा उपद्रव, उत्पादन खर्च अधिक असणे, अवकाळीमुळे नुकसान याशिवाय अन्य कारणांमुळे तेलबियांचे क्षेत्रात वाढ होत नसल्याचे म्हटले जात आहे. सूर्यफूल लागवड केल्यामुळे चांगला भावदेखील शेतकयांना मिळत असतो. मात्र हे लागवड केल्यानंतर पक्ष्यांचा या बियांना मोठ्या प्रमाणात फटका बसतो. रात्रंदिवस त्रास सहन करावा लागत असतो. पहारा द्यावा लागतो, पक्ष्यांमुळे सूर्यफूलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अश्या तक्रारी शेतकरी करत आहेत.
याबाबत जिल्हा कृषीअधिकारी संभाजी ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले कि , सध्या संपूर्ण जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. पाहायला गेलो तर जळगाव जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड वाढत आहे. मात्र शेतकऱ्यांनी एक गोष्टीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. ती म्हणजे, एका परिसरात एकाहून अधिक शेतकऱ्यांनी जर सूर्यफुलाची शेती केली तर साहजिकच पक्षी वेगवेगळ्या शेतात जातील आणि त्याचा त्रास शेतकऱ्यांनी कमी होईल.पर्यायी शेतीचे योग्य नियोज़न केल्यास शेकऱ्यांना त्यांचा फायदा होईल