जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२४ । सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकोट आणि मेहबूबनगर विशेष रेल्वे (20 सेवा)
09575 साप्ताहिक स्पेशल दिनांक 22.04.2024 ते 24.06.2024 पर्यंत दर सोमवारी 13.45 वाजता राजकोट येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.35 वाजता मेहबूबनगर पोहोचेल. (१० सेवा)
09576 साप्ताहिक स्पेशल दिनांक 23.04.2024 ते 25.06.2024 पर्यंत दर मंगळवारी मेहबूबनगर येथून 21.35 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 05.00 वाजता राजकोट पोहोचेल. (१० सेवा)
थांबे : वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आनंद, वडोदरा, सुरत, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धरमाबाद, बसर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचीगुडा ती शादनगर आणि जडचेर्ला स्थानकावर थांबेल.
रचना: 1 एसी 2-टायर, 2 एसी 3-टायर, 10 स्लीपर क्लास आणि 2 द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील.
बलसाड आणि दानापूर स्पेशल ट्रेन (20 सेवा)
09025 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 22.04.2024 ते 24.06.2024 पर्यंत दर सोमवारी 08.40 वाजता बलसाड येथून सुटेल आणि दानापूरला दुसऱ्या दिवशी 12.00 वाजता पोहोचेल. (१० सेवा) 09026 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 23.04.2024 ते 25.06.2024 पर्यंत दर मंगळवारी दानापूर येथून 14.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.30 वाजता बलसाडला पोहोचेल. (१० सेवा)
थांबे- भेटस्थान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: 1 एसी 2-टायर, 2 एसी 3-टायर, 10 स्लीपर क्लास आणि 2 द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील.
उधना आणि पाटणा विशेष गाडी (२२ सेवा)
09045 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 19.04.2024 ते 28.06.2024 पर्यंत दर शुक्रवारी 08.35 वाजता उधना येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता पाटण्याला पोहोचेल. (११ सेवा) 09046 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 20.04.2024 ते 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी 13.05 वाजता पटना येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 14.50 वाजता उधना येथे पोहोचेल. (११ सेवा)
थांबे – नंदुरबार, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: 1 एसी 1-टियर, 2 एसी 2-टायर, 6 एसी 3-टायर, 08 स्लीपर क्लास आणि 3 द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील.
उधना आणि बरौनी विशेष गाडी (20 सेवा)
09033 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 22.04.2024 ते 26.06.2024 पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी 20.35 वाजता उधना येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी 03.00 वाजता बरौनी पोहोचेल. (१० सेवा)09034 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 24.04.2024 ते 28.06.2024 पर्यंत दर बुधवार आणि शुक्रवारी 09.25 वाजता बरौनी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.00 वाजता उधना येथे पोहोचेल. (१० सेवा)
थांबे – नंदुरबार, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि पाटणा.
रचना: 1 एसी 2-टायर, 2 एसी 3-टायर, 10 स्लीपर क्लास आणि 2 द्वितीय श्रेणी सामान्य डबे असतील.
आरक्षण: सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्क आकारून बुकिंग सुरू आहे.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.