धक्कादायक! रावेरमध्ये पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही संपविले जीवन
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । रावेर तालुक्यातून एक हृदयदायक घटना समोर आलीय. पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय ४४), प्यारीबाई सुकलाल चव्हाण (वय ४२, रा. बेलखेडा, मध्यप्रदेश) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत निंभोरा व रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण या प्रौढाने भोकर नदी जवळील एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह रविवारी दिनांक ९ जून रोजी आढळून आला. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या दिवशी खिरोदा प्र. रावेर गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नथ्थु महाजन यांच्या शेतात प्यारीबाई सुकलाल चव्हाण या महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्यांमागील कारण अस्पष्ट असून मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेतमालक कमलेश महाजन यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करन्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील, सतिश सानप, सचिन घुगे, राहुल परदेशी यांनी धाव घेतली