जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । २१ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे घडलीय. समीना बानो शेख अफसर (वय २१, रा. नशिराबाद ता.जि. जळगाव) असे मयत तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, नशिराबाद येथे समीना बानो ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी तरूणीने राहत्या घरात कुणीही नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.
तरूणीच्या आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. घरातील सदस्य घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांसह शेजारच्यांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- चोपड्यात गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर पोलिसांची कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात