गुन्हेजळगाव जिल्हा

Jalgaon : गॅदरिंग पाहून आल्यानंतर वसतिगृहाच्या खोलीत गेला, अन्..; विद्यार्थ्याच्या धक्कादायक कृत्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२४ । सध्या तरुण-तरुणींमध्ये आत्महत्या सारखे प्रमाण वाढताना दिसत असून हा चिंतेचा विषय आहे. अशातच आता जळगाव शहरातील जी.एस.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने गॅदरिंग पाहून आल्यानंतर वसतिगृहाच्या खोलीत जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वंभर रत्नाकर खड़के (वय १९) असे गळफास घेतलेल्या विद्याथ्यांचे नाव असून, तो मूळचा बीडचा राहणारा आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

महाविद्यालयात गॅदरिंग सुरू आहे. ते पाहण्यासाठी सोमवारी विश्वंभर हा गेला होता. तो दुपारी १ वाजता रूमवर परत आला होता. त्यानंतर एकटाच रूमवर थांबून होता. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु तो आतून उघडला गेला नाही. सहा वाजेच्या सुमारास विश्वंभरचा रूममेट शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत यानेही दरवाजा वाजवला. पण उघडला नाही म्हणून जोरात लोटला तेव्हा दरवाजा उघडला, आत विश्वंभर हा दोरीच्या सहान्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

त्याने इतर विद्यार्थ्यांना बोलावले, त्यानंतर वसतिगृह अधीक्षकांना कळवण्यात आले. विश्वंभर खडके हा मूळचा बीड येथील नगररोडवरील ग्रामसेवक कॉलनीत राहणारा असून, तो इलेक्ट्रॉनिक्स् अॅण्ड टेली कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला होता. पोलिसांनी या घटनेची माहिती त्याचे वडील रत्नाकर खडके यांना फोनवर दिल्ली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button