तिरपोळे येथील विवाहितेची आत्महत्या

जून 5, 2021 1:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तिरपोळे येथील ३८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिमा मंगलसिंग सुर्यवंशी (वय- ३८ रा. तिरपोळे ता. चाळीसगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, तिरपोळे येथील शिमा सुर्यवंशी हिने राहत्या घरातील पंख्याला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आले. आत्महत्या मागील कारण अद्यापही स्पष्ट झालं नाहीय. दरम्यान,  याबाबत सुनेरसिंग रूपसिंग सुर्यवंशी (रा. तिरपोळे) यांच्या खबरीवरून मेहूनबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष पाटील हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now