कुसुंबा शिवारात विवाहितेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

जून 2, 2021 7:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ ।  जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात ३३ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली. संगिता प्रकाश मोहिते (वय-३३)  असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, संगिता मोहिते यांना दोन मुल असून त्या कुसुंबा येथे राहतात व त्यांचे माहेर देखील कुसुंबाचे आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून घरातील वादातून पती सोबत राहत नाहीत. त्यामुळे महिला कौटुंबिक तणावात होत्या. गावातच भाऊ बळीराम श्रावण बेलदार आणि आई चंद्रकला बेलदार हे राहतात.

बळीराम यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने आज बुधवार २ जून रोजी संगिता मोहिते ह्या बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर कामाला आल्या होत्या. दरम्यान, दुपारच्यावेळेला बांधकाम मजुरांची जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी इतर मजूर जेवणाला बसले परंतू संगिता मोहिते ह्या जेवन न करता निघून गेल्या. कुसुंबा शिवारातील एका शेतात त्यांनी उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांचा शोधाशोध केली असता विहिरीजवळ त्याच्या चपला आढळून आल्या, विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचे दुपारी २ वाजता उघडकीला आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  पुढील प्राथमिक तपास पो.कॉ. सध्देश्वर डापकर, होमगार्ड चेतन लाड करीत आहे.

आज दुपारी कुसुबां येथे विहिरीत पडलेल्या संगीता प्रकाश बेलदार यांना अग्निशमन/आपत्कालीन विभागाच्या कर्मचारी अश्वजित घरडे,देविदास सुरवाडे,प्रकाश चव्हाण,रवींद्र बोरसे,भगवान जाधव,नितीन बारी यांनी विहिरीतून बाहेर काढले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now