⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

विष प्राशन करून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली. कोमल नारायण महाजन (माळी) (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, नाचणखेडा येथील कोमल महाजन यांच्यावर खासगी बँकेचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेत त्यांनी शुक्रवारी दुपारी ११:३० वाजता त्यांच्या शेतात विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ पाचोरा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत काेमल महाजन यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत अाहे.

हे देखील वाचा :