जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२१ । एरंडोल तालुक्यातील नंदगाव येथील रहिवाशी दिपक बापू सैंदाने या सी.आर.पी.एफ.च्या जवानाने आपल्या राहत्या घरात हाताची नस कापुन आत्महत्या केली असल्याची नोंद एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल तालुक्यातील नंदगाव येथे दिपक बापू सैंदाने (वय ४२) हा सी.आर.पी.एफ.जवान होता तर सध्या पुणे येथील एन. डी.आर.एफ. ला कार्यरत होते व ते गेल्या सहा महिन्यांपासून सुट्यांमध्ये घरी आले होते.सदर घटना आज दि.१५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. दिपक हा आपल्या नंदगाव येथील घरातील मागच्या खोलीत झोपलेला होता. सकाळी ५:३० वा.सुमारास आई प्रांताबाई दिपक झोपलेला असलेल्या मागच्या खोलीत त्याला उठवण्यासाठी गेली असता त्यांना दिपक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.त्याचक्षणी त्यांनी आरडाओरड केली.
दिपकचा भाऊ मोहन सैंदाने याने दिपक यास उचलुन लागलीच एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात घेऊन गेले व नंतर एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता.डॉक्टरांनी त्यास जळगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव येथे दिपक यास घेऊन जात असतानाच रस्त्यात तो मयत झाल्याचे वाटल्याने परत त्यास एरंडोल ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता.डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
दिपक यांच्या पश्चात आई,पत्नी,एक सहा वर्षाचा मुलगा,दोन लहान भाऊ,त्यांच्या पत्नी,त्यांचे मुलं असा एकत्रित परिवार आहे.एरंडोल पोलीस स्टेशनला भाऊ मोहन सैंदाने यांनी फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास देशमुख करीत आहेत.