गळफास घेऊन वाघळीत एकाची आत्महत्या

जून 4, 2021 1:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी उघडकीस आली आहे. दिलीप रामदास धनगर (वय- ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की,  वाघळी येथे दिलीप धनगर हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान, आज त्यांनी आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधून त्याच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयताचे कारण हे अध्याप स्पष्ट झालेले नसून गणेश जबरान जाने (रा. वाघळी ) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now