⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात व्यापाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगावात व्यापाऱ्याची गळफास घेत आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शहरातील आदर्शनगरातील रहिवाशी असलेल्या व्यापाऱ्याने घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. विष्णू सच्चानंद आहुजा (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

आदर्शनगरातील समाधान गोल्ड सीटी या गृहसंकुलातील चौथ्या मजल्यावर रहिवाशी असलेले विष्णू सच्चानंद आहुजा (वय ३८) काल नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. शनिवारी सकाळी बराच वेळ झाला तरी त्यांना जाग कशी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला परंतु ते दरवाजा उघडत नव्हते. कुटुंबियांनी काही वेळाने दरवाजा तोडून उघडला तेव्हा त्यांनी छताच्या पंख्याला गळफास घेतलेला आढळून आला.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णू आहुजा यांचे बळीराम पेठेत रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे. विष्णू आहुजा यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

हेही वाचा :

    author avatar
    Tushar Bhambare