---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे यश

---Advertisement---

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स परिषदेत चमकदार कामगिरी

Physiotherapy

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडीयन असो ऑफ फिजिओथेरेपीस्टस परिषदेत चमकदार कामगीरी करत यश प्राप्त केले आहे.

---Advertisement---

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) द्वारे अलीकडेच नाशिक येथे परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या २४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याचबरोबर दोन प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल,प्राचार्य डॉ. जयवंत नागूळकर हे देखील उपस्थित होते. परिषदेत डॉ. जयवंत नागूळकर पॅनल चर्चेसाठी प्रमुख अतिथी सहभाग नोंदवत उपस्थीतांना मार्गदर्शन केले

तर प्रा. डॉ. मुकेश शिंदे आणि डॉ. रिया अग्रवाल यांनी परिषदेच्या वेळी आपले शोधनिबंध सादर केले.प्रा. डॉ. मुकेश शिंदे यांना पीएचडी गट (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान) मध्ये आपल्या प्रभावी सादरीकरणासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. या परीषदेत मान्यवरांच्या हस्ते प्रभावी कामगीरी केल्याबददल महाविद्यालयाचा सत्कार करण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment