⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगाव येथील गर्ल्स स्कूलच्या मुलींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

चाळीसगाव येथील गर्ल्स स्कूलच्या मुलींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचालित आनंदीबाई बंकट शाळेच्या इयत्ता पाचवीच्या तीन मुलींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. ही स्कॉलरशिप परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये झालेली होती. यज्ञ शशिकांत गुंजाळ (जिल्हा १८३ वा क्रमांक), सृष्टी सचिन पाखले (जिल्हा २२५ वा क्रमांक) आणि गीत चेतन कुराडे (जिल्हा २३९ वा क्रमांक) यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.

या यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मॅनेजिंग बोर्डचे चेअरमन नारायणदास अग्रवाल, अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सचिव डॉ.विनोद कोतकर, शाळा समितीचे चेअरमन प्रदीप अहिरराव, बांधकाम समितीचे चेअरमन योगेश अग्रवाल व सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. तर संयुक्त शाळा समितीचे चेअरमन मु.रा. अमृतकार यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एन. इंगळे, उपमुख्याध्यापक पी.डी. येवले, पर्यवेक्षक व्ही.ए. शिंगाडे, कार्यालय प्रमुख रमेश रोकडे व सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्यासमवेत गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन या यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार केला. त्यांना शशिकांत गुंजाळ व मोनाली पाटील यांनी मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह