---Advertisement---
जळगाव जिल्हा प्रशासन

उपप्रादेशिक परिवहन विभागाने केला तब्बल 132 कोटींचा दंड वसूल

---Advertisement---

दंडात्मक कारवाई मागे घेण्याची मागणी jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांनी 2021-22 या कालावधीत नविन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण, कच्ची व पक्की अनुज्ञप्ती, जुनी वाहन कर वसूली, अटकावून ठेवलेल्या वाहनांचा लिलाव, पर्यावरण कर वसूली, दोषी वाहन चालकांकडून दंड वसूली यांच्या माध्यमातून एकूण 132.65 कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ठ पूर्ण केलेले आहे.

---Advertisement---

सन 2021-22 या कालावधीकरीता शासनाने या कार्यालयास 163.89 कोटीचे लक्षांक दिलेले होते. कोरोना महामारीच्या
पार्श्वभूमीवर या कार्यालयाने लक्षांकाच्या 81 टक्के महसूल वसूलीचे लक्षांक पूर्ण केलेले आहे. परंतु, सन 2020-21 मध्ये या कार्यालयाकडून 109-38 कोटी इतकी महसूल वसूली करण्यात आलेली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत 21 टक्क्याने महसूल वसूलीत वाढ झालेली आहे. मागील वर्ष सन 2020-21 या दरम्यान या कार्यालयातील वायुवेग पथकाव्दारे 2.68 कोटी तडजोड शुल्क वसूली व 2.13 कोटी थकीत कराची वसूली केलेली होती. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी वायुवेग पथकामार्फत 90 टक्के जास्त दंड वसूली करण्यात आलेली आहे.


या कारवाईतंर्गत अवजड मालवाहू वाहनांतून ओव्हरलोडींग, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली वाहने, विमा प्रमाणपत्र व पीयुसी नसणे, वाहन चालकाकडे अनुज्ञप्ती नसणे, हेल्मेट परिधान न करणे, मोबाईलवर बोलणे, नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणार्‍या खाजगी बसेस, सिट बेल्ट न बांधणे, अतिवेगाने वाहन चालविणे, खाजगी बसेसमधून मालाची वाहतूक करणे इत्यादी दोषी वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे. वायूवेग पथकाच्या कारवाईतंर्गत सन 2021-22 या दरम्यान एकूण 799 माल वाहतूक करणार्‍या अवजड वाहनधारकांविरुध्द कारवाई करण्यात येऊन एकूण 3.61 कोटी दंड वसूली करण्यात आलेली आहे. या कारवाईतंर्गत अवैध प्रवास वाहतूक करणार्‍या 1461 दोषी वाहनधारक, नियमबाह्य खाजगी बसधारक 139, योगयता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या एकूण 1695 वाहनधारक, हेल्मेट परिधान न करणार्‍या 1778 दुचाकी चालक, मोबाईलवर बोलणारे 307 दुचाकी चालक, सिट बेल्ट न परिधान करणारे, 243 कार चालक, दोषी ऑटोरिक्षाधरक 708, प्वाशांची मालवाहू वाहनातून वाहतुक करणारे 401 मालवाहतूक चालक, वाहनांना मागील बाजूस रिप्लेक्टर नसणारे 1217 व अतिजलद वेगाने 522 वाहनचालक इत्यादीविरुध्द गुन्ह्याची नोंद करुन वसूली केली आह


Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---