---Advertisement---
महाराष्ट्र

स्टंटबाजी महागात पडली; लोकलच्या छतावर चढला अन् पुढं भयंकर घडलं, व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबई लोकल (Mumbai Local) ट्रेनवर स्टंटबाजी करण्याचे वेड अनेक तरुणांना लागले आहे, यामुळे अनेकदा त्यांना जीवघेणे परिणाम भोगावे लागतात. गेल्या काही दिवसात अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक तरुण धावत्या लोकल ट्रेनच्या वर चढून धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

stund

ही घटना मुंबई लोकल ट्रेनमध्ये घडली, जिथे एक तरुण दरवाजात लटकून स्टंट करू लागला. अनेक मिनिटे त्याची स्टंटबाजी सुरु होती, तो धावत्या लोकलच्या दरवाजातून वर चढण्याचा प्रयत्न करत होता. तो वर जाण्यात यशस्वी झाला आणि ट्रेनच्या वर चढल्यानंतर धोकादायक स्टंट करू लागला. मात्र, काही वेळाने त्याला विजेचा झटका बसला आणि तो गंभीर दुखापतीला बळी पडला.

---Advertisement---

या सर्व घटनेचा व्हिडिओ ट्रेनमधील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला आहे आणि तो ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘@ActualidaViral’ या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये असे धोकादायक स्टंट अनेकदा दिसून येतात, ज्यामुळे अनेक तरुणांना जीव धोक्यात घालावा लागतो. या घटनेमुळे सोशल मीडियावरून नेटकऱ्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---