जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । शिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यामंदिरात विद्यार्थांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, मुख्याध्यापक सीबी अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बीआर खंडारे व सर्व शिक्षक उपस्थित होते.
सर्वप्रथम शालापूर्व तयारी दरम्यान सर्व वर्ग सॅनिटायजर करून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर सरस्वती मातेचे पूजन विद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा दिघे व प्रेम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम दिवसाचे औचित्य साधून संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांची कन्या संस्कृती पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट व शालेय वस्तू भेट देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायजर करून गुलाब पुष्प देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे व मंगला चौधरी यांनी केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..