जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । दादासाहेब एसटी बस बंद असल्याने आमचे खूपच हाल होत असून शाळा, महाविद्यालयात पोहोचणे अवघड होतं आहे. त्यामुळे काहीही करा पण एसटी बस लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करा, अशी केविलवाणी व्यथा रस्त्यावर थांबलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आमदार अनिल पाटील यांच्याकडे मांडली.
अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील हे कार्यक्रमा निमित्त गलवाडे रोड वरून जात असताना अचानक त्यांना शाळा व कॉलेजचे काही विध्यार्थी रस्त्या लगत उभे असलेले दिसले. आमदारांनी हे चित्र पाहून तात्काळ गाडी थांबवून विद्यार्थ्यांकडे ते पोहोचले व विद्यार्थी मित्रांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. यावेळी सर्वांनी एसटी बस बंद असल्यामुळे आमचे खूपच हाल होत आहेत काही वेळा तर गलवाडे किंवा जवळच्या गावातून पायी सुद्धा चालत यावे लागते. अनेकदा शाळा, कॉलेजला पोहोचण्यास उशीर होत असल्याने शैक्षणिक नुकसान देखील होत असते, तेव्हा एसटी बस सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा अशी विनंती त्यांनी केली.
आमदारांनी विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून घेत व येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न नक्की सुटेल व तुमची हक्काची बस तुमच्या पर्यंत लवकरच पोहोचेल असे आश्वासन आमदारांनी दिले. तसेच स्वतः थांबून व्यथा एकूण घेतल्याबद्दल सर्व विध्यार्थ्यांनी आमदारांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पुढे ते मार्गस्थ झाले.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी