⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | विद्यार्थ्यांनो, अपारंपरिक उर्जेच्या स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन द्या : प्रा. महेश खवरखे

विद्यार्थ्यांनो, अपारंपरिक उर्जेच्या स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन द्या : प्रा. महेश खवरखे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याला विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता या अनुषंगाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागाने “इमेर्जिंग ट्रेंड्स इन सोलर फोटोवोल्टीक” या विषयावर कार्यशाळा आयोजीत केली होती. या कार्यशाळेत सर्टिफिइड सोलर ट्रेनर महेश खवरखे यांनी विध्यार्थ्यांना सौर ऊर्जा संयंत्र बद्दल माहिती दिली.

त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले कि, सध्या संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करत आहे. म्हणून, जगभरातील सर्व शास्त्रज्ञ अपारंपरिक उर्जेच्या स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहन देत आहेत. ज्यामुळे सौर उर्जेच्या निर्मितीसाठी जगातील विविध देशांमध्ये नवीन सौर ऊर्जा प्रकल्पांची स्थापना केली जात आहे. सौर ऊर्जेचा वापर अनेक प्रकारे केला जातो. परंतु सौर ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर प्रामुख्याने सौर ऊर्जा म्हणून ओळखले जाते. सूर्याच्या ऊर्जेचे विद्युत उर्जेमध्ये दोन प्रकारे रूपांतर करता येते, पहिले फोटो-इलेक्ट्रिक सेलच्या मदतीने आणि दुसरे म्हणजे सूर्याच्या उष्णतेने द्रव गरम करून आणि त्यातून विद्युत जनरेटर चालवून. तसेच त्यांनी यावेळी सौर ऊर्जेचे महत्व व भविष्यातील सौर ऊर्जा क्षेत्रातील नौकरी व व्यवसायातील संधी या संबंधित माहिती विद्यार्त्यांना दिली. तसेच विद्यार्त्यांना सौर ऊर्जा संयंत्राची रचना कशी कारायची या विषयी विद्यार्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्त्यांनी मार्गदर्शकांशी चर्चा करून आपल्या शंकांचे निवारण करून घेतले व आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश खवरखे यांचे स्वागत विभाग प्रमुख प्रा. बिपाशा पत्रा यांनी केले. या कार्यशाळेचे नियोजन प्रा. मनीष महाले यांनी केले व प्रा.मयुरी गचके यांनी उपस्थित मार्गदर्शकांचे आभार केले. कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह