जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील झितोम माध्यमिक व नाभापा ज्युनियर विद्यालयात हरितसेना विभागाच्या वतीने पर्यावरण पुरक शाडू माती पासून गणपती बनविणे उपक्रम प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनात हरितसेना शिक्षक देविदास महाजन यांनी आयोजित केला. शाडू माती पासून मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी रविंद्र नवल कोळी यांनी दाखविले.

हरितसेना शिक्षक देविदास महाजन यांनी प्लास्टर ओफ पॅरिसच्या मुर्त्या पर्यावरणास कशा घातक आहेत ते सांगतांना वापरल्या जाणाऱ्या केमिकल युक्त विषारी रंगा मुळे नदी, तलाव व इतर ठिकाणच्या पाण्याचे होणाऱ्या प्रदुषणा विषयी माहिती दिली. जागरुकता विषयी माहीती दिली. पर्यावरण पुरक मुर्तीची आवश्यकता विषयी मार्गदर्शन केले. स्वतः तयार करुन नैसर्गिक रंगाने रंगविलेली मुर्तीची घरी स्थापना करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला वाव देणाऱ्या या उपक्रमात 300 विद्यार्थी उपस्थित होते. सुंदर, सुबक व पर्यावरण पुरक मुर्ती बणविणार्या पहील्या तीन विद्यार्थ्याना हरितसेना विभागाच्या वतीने बक्षिस दिले जाणार आहे.
विद्यालयात 10 वी च्या विद्यार्थ्यांनी नवल कोळी यांच्या मदतीने बनविलेली मुर्ती विराजमान केली जाणार आहे. विद्यालयाचे चेअरमन सुखदेवराव पाटील, अध्यक्ष बी एस महाजन, वामनराव महाजन, बाजीराव पाटील,प्रदीप महाजन, प्राचार्य के एन जमादार, उपमुख्याध्यापक मोहन चव्हाण, पर्यवेक्षक नवल महाजन, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्त व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.*