बातम्या
एसटीच्या ‘या’ निर्णयामुळे रोज होणार लाखोंची बचत
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । एसटी महामंडळ बसेससाठी आतापर्यंत घाऊक दराने डिझेल खरेदी केले जात हाेते; मात्र त्यामुळे मंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी आता किरकोळ दरात डिझेल खरेदी केले जात आहे. त्यामुळे जळगाव विभागात लिटरमागे १५ रुपयांची बचत होऊन जळगाव विभागात दिवसाकाठी तीन लाखांची बचत होत आहे. डिझेल खरेदीसाठी विभागात प्रत्येक आगारात एक तर शहरात तीन पेट्रोल पंप आरक्षित केले आहेत. एसटी महामंडळाने विभागात डिझेल भरण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारात एक पेट्रोल पंप तर जळगावात ३ पेट्रोल पंप चालकांशी करार केला. या पंपांतून बसेसमध्ये डिझेल भरले जाणार आहे. सध्या एसटीला दररोज २० हजार लिटर डिझेल लागत आहे. त्यामुळे जळगाव विभागात एसटीचे डिझेलातून दररोज तीन लाखांची बचत होणार आहे. अर्थात, खर्चात या माध्यमातून बचत हाेईल. |