⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

राष्ट्रीय कुटुंब आयोग सर्वेक्षणाच्या अहवालाला जळगावात जैन समाजाचा कडाडून विरोध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२२ ।
जैन धर्माचे 14.9 टक्के पुरुष व 4.3 टक्के पुरूष हे मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आयोग सर्वेक्षण 2019 – 21च्याअहवालात दिला आहे. या अहवालाला विरोधात संपूर्ण देशामध्ये जैन धर्मियांकडून विरोध प्रकट केला जात आहे. जळगाव मध्ये देखील या विरोधात मत जैन धर्मीय बांधव नोंदवत आहेत.

जळगाव शहरातील दलुभाऊ जैन यांनी जळगाव लाईव्हशी प्रतिक्रिया दिली की, केंद्र शासनाने दिलेला अहवाल हा अतिशय चुकीचा आहे. या अहवालात काहीही खरे नाही. जैन धर्म हा अहिंसक धर्म आहे यात मांसाहार केलेले चालत नाही. व जैनधर्मीय मांसाहार करतही नाहीत. यामुळे या अहवालाची मी कठोर शब्दात निंदा करतो.

तर दुसरीकडे जळगाव शहरातील जैन धर्मीयांमध्ये प्रतिष्ठित असलेले प्रदीप मुथा म्हणाले की, या अहवालावर आमचा विश्वास नाही. अहवाल करताना त्यांनी किती लोकांचे सॅम्पल घेतले आणि कशाप्रकारे हा अहवाल मांडला याची माहिती त्यांनी संपूर्ण समाजाला देणे आवश्यक आहे. जैन धर्मीयांमध्ये कोणी मांसाहार करत हे होणे शक्यच नाही. आमचा त्या अहवालावर विश्वास नाही.

जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अमर जैन यांनी जळगावला विषयी बोलताना माहिती दिली कि केंद्र शासनाचा हा अतिकेंद्र शासनाचा हा अतिशय चुकीचा आहे. या अहवालाची आम्ही निंदा करतो त्यांनी हा अहवाल पुन्हा बनवला पाहिजे.