जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्यांना रस्ता, पाणी आणि वीज या तीन मूलभूत गोष्टीची गरज असून त्यांच्या या मूलभूत गरजा लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.
रविवार दि.३० रोजी कुऱ्हा (ता.बोदवड) येथे आमदार चंद्रकांत पाटील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तक्रारी ऐकूण त्या तक्रारी सोडविण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मातोश्री ग्राम समृद्धी पानधन रस्ते तयार करण्यासाठी यादी तयार करणे, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण होताच त्या व्यक्तींना प्रमाणपत्र हातोहात देण्याचे नियोजन करणे असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थिनींनी बस गावात येत नसल्याने बोदवड फाट्यापर्यंत पायी जावे लागत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी ३० वर्षापासून विद्यार्थी बोदवड फाट्यापर्यंत पायी जात आहेत, ही शोकांतिका असून लवकरच गावात बस येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. अनेक गावकऱ्यांच्या तक्रारी याठिकाणी मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, गट विकास अधिकारी श्री. नागतीलक, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. घडेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख अफसर खान, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, संजय पाटील, गटनेते राजू हिवराळे, विभाग प्रमुख विनोद पाटील, नितीन कांडेलकर, गणेश टोंगे, दीपक पवार, पंकज पांडव, सतीश नागरे, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख अकबर ठेकेदार, दीपक वाघ, गण प्रमुख दिलीप भोलानकर, बाळासाहेब पाटील, सरपंच काशिनाथ वानखेडे, सरपंच कुरबान तडवी, सोनाजी पारधी, पांडुरंग तांबे, शैलेश पाटील, योगेश मुळक, राजू शर्मा, उल्हास पाटील, अमोल पाटील, संदीप ढेंगे, संदीप ढिवरे, संजय जवरे, भरत पाटील, छोटू पाटील, नरेंद्र पाटील, गणेश पाटील, जयेश वाघ, पंकज धाबे, शिव भोसले, शुभम शर्मा, बाळू पाटील, ज्ञानू पाटील, अशोक खवले, अशोक गरड, भास्कर सोनवणे, निलेश पाटील, सरपंच शालू तायडे, उपसरपंच इंदुबाई कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सोनवणे, दिलीप कांडेलकर, लहू घुडे, वामन पाटील, विष्णू पाटील, सुधाकर पाटील, वैभव पाटील, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, आत्माराम पाटील, वासुदेव मोरे, विष्णू इंगळे, प्रवीण पाटील, निलेश नावकर, मुरलीधर हटकर, संतोष कांडेलकर, शिवाजी इंगळे, अनिल सावळे, आकाश नावकर, नरेश पाटील, गौतम सावळे, अशोक कांडेलकर, योगेश आंबेकर, संदेश कांडेलकर, विशाल पाटील, रमेश पाटोळे, आदित्य पाटील, गोकुळ धांडे आदी उपस्थित होते.