धक्कादायक ! दारूसाठी पैसे नाकारल्याने वृद्धेच्या डोक्यात घातला दगड; पतीलाही मारहाण, पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

एप्रिल 28, 2026 6:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरांतील तांबापुरा भागातील मच्छी बाजार परिसरामधून एका धक्कादायक घटना समोर आली असून दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एका नराधम तरुणाने ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या पतीलाही मारहाण करून त्यांच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

तांबापुरा भागातील रिक्षा चालक युसूफ मुसा खाटीक (वय ६५) हे २६ एप्रिलच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास पत्नी सलमा बी यांच्यासह घराबाहेर पाणी भरत होते. यावेळी संशयित आरोपी मोहम्मद शेख मेहमूद तिथे आला आणि त्याने दारू पिण्यासाठी सलमा बी यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली. सलमा बी यांनी पैसे देण्यास नकार देताच मोहम्मदने संतापून जवळच पडलेला दगड त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

दगड मारल्यानंतर आरोपी मोहम्मदने युसूफ खाटीक यांच्या खिशातील ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि तिथून पळ काढला. जखमी सलमा बी यांना तातडीने ‘सारा हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, क्रूरतेचा कळस म्हणजे २७ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपीचा पिता मेहमूद शेख मेहबूब याने हॉस्पिटलबाहेर जाऊन युसूफ खाटीक यांना मुलाच्या कृत्याबद्दल माफी मागण्याऐवजी उलट जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई:
युसूफ खाटीक यांच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलिसांनी आरोपी मोहम्मद आणि त्याचा पिता मेहमूद यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक कोळे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now