VIDEO : जळगाव शहरात दोन गटात दगडफेक; पाच ते सहा जण जखमी, घटना सीसीटीव्हीत कैद

जुलै 23, 2025 12:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात किरकोळ कारणावरून होणारे वाद वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडली. ज्यात दोन गटात झालेल्या या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Stone pelting jalgaon

नेमकी घटना काय?

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत परिसरात मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला मेडिकल दुकानावरून मालकाने काढण्याच्या रागावरून रामेश्वर कॉलनी परिसरात दोन गटात टोळक्यांनी दगडफेक केली. रात्रीच्या सुमारास काही तरुण परिसरातील स्वामी समर्थ चौकातील अपार्टमेंट जवळ उभे होते. याच वेळी दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने दुचाकींवरून शिवीगाळ करीत तेथे उभ्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात धावपळ सुरु झाली होती.

या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन टोळक्याने ही दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रक्रिया एमआयडीसी पोलिसात सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील दहा ते पंधरा जणांना एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली आहे.

दरम्यान, घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण पसल्याने रात्री उशिरा परिसरात दंगा नियंत्रण पथक व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now