जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । बोदवड तालुक्यातील जलचक्र खुर्द येथील महालक्ष्मी स्टोनक्रशरधारकाला जवळपास ५ कोटींचा दंड ठोठावला आहे. कारण महालक्ष्मी स्टोनक्रशर धारकाने अवैध ऊत्खनन करुन शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याची तक्रार शिवसेना कार्यकर्त्यांनी २८ एप्रिल २०२० रोजी केली होती.
महसूल बुडवल्याप्रकरणी, तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या आदेशानुसार महालक्ष्मी स्टोनक्रशरधारकाला ४ कोटी ८६ लाख २९ हजार ७७१ रुपयांचा दंड ठोठावला आहे.
स्टोनक्रशरधारकाने ४२९४.२१ ब्रास अवैध गौण खनिजाचा वापर केलेला अाढळला. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बोदवड तहसीलदारांना आदेश दिले. तत्कालीन तीन तहसीलदारांच्या बदल्या झाल्यानंतर महसूल प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बोदवड तहसीलदार योगेश्वर टोपे यांनी २० रोजी दंडाचे आदेश काढले.
दीड वर्षांची प्रतीक्षा
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार टोपे यांनी ४ कोटी ८६ लाख २९ हजार ७७१ रुपयांचा दंड ठोठावल्याचा आदेश काढला आहे. तब्बल तीन तहसीलदारांच्या बदल्या झाल्यानंतर दीड वर्षांनी ही तक्रार निकाली काढण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?