विश्व हिंदू परिषद तर्फे बालिकेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग जळगाव तर्फे पुण्यातील 14 वर्षाच्या अज्ञान बालिकेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले.
पुण्यात 14 वर्षाच्या अज्ञान बालिकेवर 13 व्यक्ति द्वारा सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे. माणसाला माणूस म्हणावे की नाही अशी परिस्थिती या घटनेमुळे निर्माण झालेली आहे. पशु ला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचे कृत्य या नराधमांनी केलेले आहे. तर या नराधमांना जितकी जास्त शिक्षा देण्यात येईल ती शिक्षा देखील यांना कमी होईल, अशा प्रकारचे कृत्य या लोकांनी केलेले आहे तसेच या घटनेमुळे समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालेली असून अशा घटनांमुळे समाजातील वातावरण दूषित होण्याचे काम होत आहे.
महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे तथा महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहराला विद्येचे माहेर घर असे संबोधिले जात असते आणि येथे अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद आहे.
तरी विश्व हिंदू परिषद मातृशक्ती विभाग जळगाव यांच्यातर्फे सदरील घटनेचा निषेध करण्यात येत असून या १३ व्यक्तींवर कठोर कारवाईच्या स्वरूपात फास्ट ट्रॅक कोर्टात सहा महिन्याच्या आत सदरील केस चालवून नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष संध्या देशमुख, ॲड. पल्लवी कुलकर्णी, ॲड. लीना म्हस्के, संयोजिका स्नेहल विसपुते, विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष खंडू पवार, विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार उपाध्यक्ष धनंजय तिवारी, विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा सह मंत्री ॲड. श्रीराम बारी, बजरंग दल जळगाव जिल्हा संयोजक राजेंद्र नन्नवरे , विश्व हिंदू परिषद जिल्हा सह सेवा प्रमुख दीपक दाभाडे, विश्व हिंदू परिषद जळगाव महानगर उपाध्यक्ष विशाल जगदाळे , महानगर मंत्री मनोज बाविस्कर, महानगर गोरक्षा प्रमुख आकाश पाटील, ॲड. शैलेश पवार , पुनम राजपूत इत्यादी उपस्थित होते.