जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । राज्यात बनावट मद्य, बेकायदेशीर विक्री करणाऱ्यावर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एप्रिल ते डिसेंबर २०२१ या नऊ महिन्यात ६२७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ८९ लाख १५ हजार ३८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संबधितांवर स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
२०२१ वर्ष नुकतेच संपले आहे. गतवर्षी कोरोना काळातील निर्बंध कडक असल्यामुळे मद्यविक्रीवर परिणाम झालेला होता. अशात अनेकांनी बनावट मद्य तयार करुन विक्री केल्याचेही अनेक प्रकरणे समोर आले.
राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने विशेष भरारी पथके नेमुन या लोकांवर कारवाई केल्या. यात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात जिल्ह्यात एकूण १ हजार ३४२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ६२७ संशयितांना अटक केली. ४८ वाहने जप्त केली आहे.

संबधितांवर स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली.
हे देखील वाचा :
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !
- गिरणा नदीपात्रात धडक कारवाई ; २९ वाहने ताब्यात, ३.६० कोटींचा मुद्देमाल ताब्यात
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू







