जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । एसटीच्या विलीनीकरणावरून मागील गेल्या ८० दिवसापासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप अद्यापही कायम असून शासन त्यांची दखल घेत नाही. सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी आंदोलन केले.
जळगावात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु केले आहे. भीक मागून जमा झालेली रक्कम राज्य सरकारला देण्यात येणार आहे.
एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांनी दुकानदार, पादचारी, वाहनधारक अशा सर्वांकडे भीक मागितली. अडीच ते तीन वर्ष वयाची मुलेही या आंदोलनात सहभागी झाले होते. भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा :
- सोनं-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी खुशखबर; आठवड्याच्या पहिल्याच भाव घसरले
- जळगावचा पारा पुन्हा घसरण; यंदाच्या मौसमातल ठरलं सर्वात निचांकी तापमान, आज कसं असेल तापमान?
- आज वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता; जाणून घ्या सोमवारचे राशीभविष्य
- नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न ; कोण-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ? जाणून घ्या
- गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ