नशिराबाद टोल नाक्याजवळ एसटीचा भीषण अपघात ; प्रवाशी महिला जागीच ठार

ऑक्टोबर 28, 2025 2:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२५ । राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक एसटी बसची दुरावस्था झालेली दिसून येतेय. कुठे बसचे टायर निखळले, टायर फुटने, तर कुठे दरवाजा, खिडकी नसलेल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसून येतंय. अशी दुरावस्था असतानाही नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. अशातच जळगाव-भुसावळ मार्गावरील नशिराबाद टोल नाक्याजवळ एसटी बसला अपघात झाला.

bs acc

अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात असताना नशिराबाद टोल नाक्याजवळ बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटले अन् बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट टोल नाक्याजवळील एका भिंतीवर जाऊन आदळली.

या दुर्घटनेत बसमध्ये बसलेली एक महिला प्रवासी खिडकीतून बाहेर फेकली गेल्याने ती बसच्या मागील चाकाखाली आली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. साराबाई गणेश भोई (४६, रा. पाडळसे, ता. यावल), असे मृत प्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि टोल नाक्याजवळील वाहनधारकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू केली होती, नशिराबाद पोलिसांकडून अपघाताची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now