---Advertisement---
नोकरी संधी

10वी उत्तीर्ण अद्यापही अर्ज केला नाहीय.. SSC मार्फत 11409 पदाच्या भरतीसाठी उरले काही तास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी चालून आली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने MTS आणि हवालदार भरतीसाठी एकूण 11409 जागांची अधिसूचना जारी केली आहे. ज्याद्वारे आयोगाने एमटीएसच्या 10,880 आणि हवालदाराच्या 529 पदांची भरती जाहीर केली आहे. अधिसूचना जारी होताच, भरती परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जही सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची आज म्हणजेच तारीख 17 फेब्रुवारी 2023  (11:00 PM) आहे. त्यामुळे तुम्ही जर अद्यापही अर्ज केला नसेल तर त्वरित अर्ज करा SSC Recruitment 2023

SSC MTS Recruitment 2022 jpg webp

शैक्षणिक पात्रता काय असावी?
10वी पास उमेदवार एमटीएस आणि हवालदार पदांसाठी फॉर्म भरू शकतात. आणि उमेदवारांचे वय 18-25 वर्षे असावे. तथापि, काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.

---Advertisement---

अर्ज शुल्क : 100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज कसा करायचा
उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. यासाठी भरती लिंकवर जाऊन उपलब्ध करून दिलेला फॉर्म भरावा लागेल आणि फी जमा करावी लागेल. लक्षात घ्या की अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे. आणि फी जमा करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2023 आहे.

निवड प्रक्रिया
उमेदवारांच्या निवडीसाठी संगणक आधारित चाचणी घेतली जाईल. मात्र, हवालदार पदांसाठी परीक्षेनंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजेच पीईटीही द्यावी लागणार आहे. ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल. त्यामुळे महिला उमेदवारांना 1 किलोमीटरची शर्यत 20 मिनिटांत पूर्ण करावी लागते.

अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---