⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

स्टाफ सिलेक्शन मार्फत 4726 पदांची मेगा भरती, 12वी उत्तीर्णांसाठी आजची शेवटची संधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । कर्मचारी निवड आयोग (SSC CHSL Recruitment 2022) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे.स्टाफ सिलेक्शन कमिशनने CHSL भर्ती परीक्षा 2021 ची अधिसूचना SSC द्वारे जारी केली जाईल. या अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये हजारो पदे भरण्यासाठी बंपर भरती केली जाणार आहे. त्यामुळे 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. ज्यांनी अजूनही अर्ज केला नाहीय त्यांनी वेळेच्या आत अर्ज करून घ्यावा. शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे. त्याचबरोबर १० मार्चपर्यंत चलनाद्वारे शुल्क जमा करता येणार आहे. फॉर्ममध्ये दुरुस्तीची विंडो 11 मार्चपासून उघडेल. 15 मार्च 2022 पर्यंत उमेदवारांना फॉर्ममध्ये दुरुस्त्या करता येतील. SSC CHSL 2022 च्या परीक्षा मे मध्ये घेण्यात येतील.

एकूण जागा : ४७२६

पदाचे नाव :
१) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)
२) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
३) पोस्टल असिस्टंट (PA)
४) सॉर्टिंग असिस्टंट (SA)
५) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
६) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे.

मानधन / Pay Scale :

1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – १९,९०० ते ६३,२०० /-
2) पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) – २५,५०० ते ८१,१०० /-
3) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) – २५,५०० ते ८१,१०० /-
4) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ – २५,५०० ते ८१,१०० /-

अर्ज कसा करायचा

SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
नोटिफिकेशन आऊट झाल्यावर, होमपेजवर ‘लागू करा’ टॅबवर क्लिक करा.
CHSL वर जा आणि संबंधित तपशील प्रविष्ट करून स्वतःची नोंदणी करा.
तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
SSC CHSL अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा आणि अर्ज फी भरा.
भविष्यातील संदर्भासाठी पुष्टीकरण पृष्ठ जतन करा

निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे केली जाईल. टियर-1 परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. जे उमेदवार पहिल्या टप्प्यातील परीक्षा उत्तीर्ण होतील ते टियर-2 परीक्षेत बसू शकतील. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार अंतिम निवडीसाठी पात्र असतील.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – Notification

Online अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा – Apply Online