---Advertisement---
नोकरी संधी

7वी पाससाठी नोकरीची संधी..राज्य राखीव पोलिस बल धुळे येथे बंपर भरती, वेतन 47000 पर्यंत

---Advertisement---

SRPF Recruitment 2022 : 7वी पाससाठी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी चालून आलीय. राज्य राखीव पोलिस बल(State Reserve Police Force) धुळे येथे भोजन सेवक व सफाईकामगार पदांसाठी भरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आहे.

SRPF Recruitment 2022 jpg webp

पदसंख्या : १९

---Advertisement---

रिक्त पदांचा तपशील :

१) भोजन सेवक- १७
२) सफाईकामगार – ०२

आवश्यक पात्रता :

उमेदवार ७ वी परीक्षा उत्तीर्ण असावा .

वयोमर्यादा :

भोजन सेवक : दि. 31.03.2022 रोजी कमीत कमी वय 18 व जास्तीत जास्त वय 38 वर्षपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांकरीता वय 43 वर्षे (तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केल्याप्रमाणे शिथिलक्षम राहिल.) (शा.नि. क्रमांक एसआरव्ही 2015/प्र.क्रमांक404/ कार्यालय/12, दि.25 एप्रिल 2016)

सफाईकामगार : दि. 31.03.2022 रोजी कमीत कमी वय 18 व जास्तीत जास्त वय 38 वर्षपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांकरीता वय 43 वर्षे (तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय उमेदवारांना शासनाने वेळोवेळी घोषित केल्याप्रमाणे शिथिलक्षम राहिल.) (साप्रवि अधिसूचना दिनांक 6 जून 2017)

इतका मिळेल पगार :

१५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

आवश्यक कागदपत्रे :

पदाकरीता धारण करीत असलेली विहित अर्हता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला व पुढीलशिक्षणाचे (असल्यास) गुणपत्रक / प्रमाणपत्र.
जातीचे प्रमाणपत्र.
उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.)
जातीचे वैधता प्रमाणपत्र,
अनुसुचीत जाती, EWS व खुला या प्रवर्गातील उमेदवार वगळून नॉनक्रिमीलीअर प्रमाणपत्र चालु वर्षाचे ग्राह्य धरण्यात येईल.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असलेबाबतचे प्रमाणपत्र.
शासकीय / निमशासकीय अथवा अन्य प्रकारच्या नोकरीत असलेल्या उमेदवारांनी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६, धुळे

भरतीसंदर्भात जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---