⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | गुन्हे | भरधाव कारने एकाला उडवले : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

भरधाव कारने एकाला उडवले : जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । जळगाव तालुक्यातील उमाळा फाट्याजवळ अज्ञात भरधाव कारने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील उमाळा येथील रहिवासी रघुनाथ रतन शिंदे (वय-४३) हे आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. १५ जून रोजी सकाळी ८ वाजता उमाळा फाट्याजवळ ते उभे असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात रघुनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी दीड महिन्यानंतर मयताची पत्नी सुनंदा रघुनाथ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २९ जुलै रोजी रात्री ९ वाजता अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिश शेख करीत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह