⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

प्रवाशांना आनंदाची बातमी ! भुसावळमार्गे अहमदाबादकडे धावणारी विशेष ट्रेन सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । दहावी, बारावी परीक्षेनंतर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी दिसून येते. सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे, याच दरम्यान, उन्हाळी काळात रेल्वे प्रशासन कोईम्बतूर- भगत की कोठी दरम्यान विशेष गाडी चालवणार आहे. ही गाडी भुसावळ धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे.

०६१८१ कोईम्बतूर – भगत की कोठी गाडी आज म्हणजेच १४ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक गुरुवारी कोईम्बतूर येथून पहाटे २.३० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी भगत की कोठी येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. ०६१८२ भगत की कोठी – कोईम्बतूर विशेष गाडी १७ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुपारी २ वाजून ४५ पोहोचेल. तर जळगाव स्थानकावर ही गाडी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटाने पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा
काचीगुडा, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे थांबा आहे.

कोच रचना: 4- एसी थ्री टायर कोच, 7- एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच, 1- स्लीपर क्लास कोच, 4- जनरल सेकंड क्लास कोच, 1- सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन फ्रेंडली) आणि 1- लगेज कम ब्रेक व्हॅस