⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

जळगावमार्गे नागपूर ते सिकंदराबाद विशेष रेल्वे आजपासून धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२२ । आरआरबी एनटीपीसी 2022 सीबीटी-2 (RRB NTPC 2022 CBT-2) परीक्षा 9 आणि 10 मे रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. याच पार्श्वभूमीवर रेल्वेच्या परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने 9 आणि 10 मे रोजी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी देशभरात 65 हून अधिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यात नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान विशेष रेल्वे धावणार आहे. गाडी क्र. ०१२०३ ही ७ मे रोजी नागपूर येथून दुपारी दीड वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०४ ही ९ मे रोजी सिकंदराबाद येथून रात्री ८.३० वाजता सुटून नागपूरला तिसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचणार.या ट्रेनसाठीचे बुकिंग 6 मे रोजी सुरु झाले आहे.

असे आहे थांबे?
वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलाबुर्गी, वाडी, लिंगमपल्ली या स्थानकांवर तिला थांबा दिला आहे.