अरे वा! जळगावहुन खाटू श्याम, सालासर बालाजींच्या दर्शनासाठी विशेष बससेवा; ‘इतके’ लागणार भाडे?

नोव्हेंबर 22, 2025 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२५ । तुम्हालाही जर राजस्थानमधील खाटू श्याम बाबा, सालासर बालाजी, सावरीया शेठ दर्शनासाठी जायचं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष बससेवेचे आयोजन करण्यात आले. जळगावमधून थेट एसटी बसने तुम्हाला खाटू श्याम बाबा, सालासर बालाजी, सावरीया शेठच्या दर्शनासाठी जाता येणार आहे.

khatu shyam bus

२८ नोव्हेंबर रोजी जळगाव येथून सुरू होत असलेल्या या विशेष बससेवेचे प्रति प्रवासी भाडे ४,८२५ रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ही बस सेवा सुरु करण्यात येत आहे.

असे आहे नियोजन

एसटी महामंडळाच्या पॅकेज टूर्स या संकल्पना अंतर्गत २८ नोव्हेंबरला विशेष बस जळगावहून निघून सावरीया शेठ येथे पोहोचेल आणि तेथे मुक्काम करेल. २९ नोव्हेंबर रोजी चित्तोडगढहून बस खाटू श्याम येथे पोहोचेल. तेथे मुक्कामाची सोय असेल. ३० रोजी भाविक सालासर बालाजीचे दर्शन घेऊन परततील.

बससेवेचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागेल. जळगाव आगारात वाहतूक निरीक्षक भरत सूर्यवंशी, राहूल पाटील, वाहतूक नियंत्रक संदीप सूर्यवंशी, योगेश वाणी यांच्याशी संपर्क साधावा असे आगार व्यवस्थापक संदीप पाटील म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now