पोळी स्वस्त, भाकर झाली महाग; ज्वारीची आवक घटल्याने दरात मोठी वाढ

एप्रिल 14, 2026 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकेकाळी ‘गरिबांचे अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीने आता भाव खाल्ला आहे. गेल्या हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारीचे उत्पादन घटल्याने बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक कमी झाली आहे. परिणामी, ज्वारीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून भाकरी महाग झाली आहे, तर गव्हाच्या तुलनेत पोळी तुलनेने स्वस्त राहिली आहे.

jwari

स्थानिक बाजारपेठेत सध्या ज्वारीच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या मालदांडी ज्वारीला अधिक मागणी असून तिचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्यांच्या तुलनेत ज्वारीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर याचा परिणाम जाणवत आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, ज्वारीला नेहमीच मोठी मागणी असते. मात्र यंदा उत्पादन घटल्यामुळे बाजारात पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे दरात चढ-उतार होत असून सध्या ज्वारीचे भाव २५०० ते ५५०० हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गहू आणि तांदळाच्या तुलनेत ज्वारी महाग झाल्याने ग्रामीण भागातही भाकरीचा खर्च वाढला आहे. येत्या हंगामात उत्पादन वाढल्यास दरात काहीशी स्थिरता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन गव्हाचे दर
गव्हाचा प्रकार – गव्हाचे दर (प्रति क्विंटल)
शरबती – ३००० ते ३२०० रुपये
लोकवन – २८०० ते ३००० रुपये
चंदोसी- ५५०० ते ६५०० रुपये

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now