जळगाव शहर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात अत्याधुनिक मशिनी उपलब्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

त्वचारोगावरील उपचार आता झाले अधिक सोपे ; अत्याधुनिक मशिनी उपलब्ध

 

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील त्वचारोग व गुप्तरोग विभागात अत्याधुनिक दोन मशीनची सेवा उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत सामान्य नागरिकांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे नागरिकांना त्वचारोगावरील अत्याधुनिक उपचार घेण्यासाठी आता शासकीय रुग्णालयात अद्ययावत सुविधा सुरू झाली आहे.

मायक्रोडर्मा अब्रेजन, क्यू-स्विच्ड एन् डी याग लेझर अशा या २ मशीन आहेत. या मशिनींची अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पाहणी केली. यावेळी डॉ. स्नेहल लोळगे, डॉ. स्मित पवार, डॉ. राज शाह उपस्थित होते. प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी मशीन व त्याचे रुग्णांना होणारे लाभ याविषयी माहिती जाणून घेतली. यामध्ये स्विच्ड लेझर मशिनींमुळे गोंदण, टॅटू काढणे, जन्मखूण काढणे, त्वचेवरील वंगावर उपचार करणे, काळे डाग काढणे शक्य होणार आहे. तर लेझर कार्बन पील हि वेदनारहित प्रक्रिया आहे. त्वचेची प्रत व दर्जा सुधारण्यासाठी तसेच पिंपल्स, पिंपल्सचे डाग, त्वचेवरील मोठे छिद्र, पिम्पल्सवरील इतर उपचार करण्यासाठी हि मशीन काम करते.

तसेच मायक्रोडर्मा अब्रेजन नवीन प्रकारचे यंत्र आहे. त्वचेची पुनरुत्पादक क्षमता सुधारण्यासाठी, त्वचेवरील डाग काढणे, रंगद्रव्य यासारख्या त्वचेच्या स्थितीच्या उपचारात प्रभावी आहे. ह्या मशीनद्वारे त्वचेवरील मृत पेशी नियंत्रित आणि सौम्यपणे काढून टाकण्यास मदत करते. याचा उपयोग त्वचेचे तारुण्य जपण्याकरता तसेच सूर्यकिरणाने खराब झालेल्या त्वचेसाठी सुरकुत्या, तेलकट छिद्र, निस्तेज त्वचा, खरबडीत त्वचा, वरवरची काळी, त्वचा सुधरवण्यासाठी चेहऱ्यावरील मोठी छिद्रे, कांजण्याचे खड्डे निर्मूलन करणे, चार आठव्यानंतर त्वचा सामान्यकृत होणे, जिवंत पेशींच्या संख्येत वाढ करणे, त्वचेच्या पातळ्यांची पुनर्रचना करणे असे कार्य या मशीनद्वारे चालते. या मशीनचे फायदे महत्वपूर्ण आहेत. उपचार वेदनारहित तसेच कुठल्याही ऍलर्जीचा धोका नाही. अत्यंत सुरक्षित आहे.

हे उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी इमारतीत कक्ष क्रमांक ३०२ येथे सकाळी ९ ते १ या वेळेत सर्व नागरिकांना उपलब्ध आहेत. नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button