जळगाव शहर

घनकचरा प्रकल्प : बांधकाम साहित्यात झालेल्या भाववाढीमुळे मक्तेदाराकडून वाढीव खर्चाची मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । जळगाव शहासाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या घनकचरा प्रकल्पाच्या वाढीव डीपीआरला शिवसेनेने बहुमताने मान्यता प्रदान केली. त्यामुळे प्रकल्प उभारणी तातडीने सुरू हाेईल अशी अपेक्षा हाेती. मात्र बांधकाम साहित्यात झालेल्या भाववाढीचा फटका या प्रकल्पाला बसण्याची शक्यता आहे. कारण संबंधित मक्तेदाराने आयुक्तांची भेट घेऊन वाढीव खर्चाची तरतूद करून मिळावी, अशी मागणी केली आहे.
अधिक माहिती अशी कि, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीआव्हाणे शिवारातील घनकचरा प्रकल्पाच्या जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जून २०२१मध्ये प्रकल्पाच्या वाढीव डीपीआरला मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला हाेता. त्यावर २०२१मध्ये चर्चा हाेऊन तहकूब करण्यात अाला. गेल्या महिन्यात १४ फेब्रुवारीला हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात शिवसेनेला यश अाले. नुकत्याच झालेल्या महासभेत मागच्या सभेचे इतिवृत्त मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे आता मक्तेदाराला कार्यादेश देऊन कामाला सुरुवात हाेईल असे वातावरण हाेते; परंतु प्रकल्पाच्या कामात पुन्हा दरवाढीचे स्पीडब्रेकर आडवे येण्याची शक्यता वाढली आहे.

Related Articles

Back to top button