जळगाव जिल्हाजळगाव शहर

सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे : आ.भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंमबर २०२१ । समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यांच्या कामांचे मूल्यमापन पुरस्कारामुळे होत असते. पुरस्कारामुळे काम करणार्‍यांना प्रोत्साहन मिळते. त्यांना मिळणारी छोटी शाबासकी मोठी प्रेरणा देऊन जाते. त्यामुळे समाजात चांगले काम करीत राहा, सामाजिक बांधिलकी खूप महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शहराचे आ.सुरेश भोळे यांनी केले.

सेवक सेवाभावी संस्थातर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२१” देऊन रविवारी दि. २६ डिसेंबर रोजी गौरविण्यात आले. यावेळी मंचावर आ. सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंकुश आगलावे, ‘देवमाणूस’ मालिका फेम अभिनेत्री पुष्पा चौधरी, नवी दिल्ली येथील प्रदीपकुमार आर्यन, डॉ.ऍड.जया उभे, रावेरच्या नगरसेविका शारदा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते वंदना वाकचौरे, माधुरी कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, चित्रलेखा मालपाणी, विशाल शर्मा, किशोर पाटील आदी मंच वर उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. त्यानंतर प्रस्तावनेत सेवक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करीत कोरोना काळात प्रशंसनीय कार्य करणाऱ्या समाजातील रत्नांचा हा सत्कार अनमोल असल्याचे सांगितले. यानंतर कोरोना महामारीच्या काळामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, कृषी, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात सर्वोत्तम कार्य करून समाजाची सेवा करणार्‍या नागरिकांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२१’ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आ.सुरेश भोळे यांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान करीत त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले. कोणतेही काम लहान मोठे नसते, तर त्यामागील भावना महत्वाच्या असतात असेही ते म्हणाले.

महापौर जयश्री महाजन म्हणाल्या की, महाराष्ट्र गौरव पुरस्कारातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी. आपल्या कार्याचा आलेख नेहमी आपल्या कामातून दिसून येतो. चांगले काम सतत करत राहणे हे महत्वाचे आहे. समाजात गरजूंना मदत करत राहणे महत्वाचे आहे. कोविड महामारीच्या काळात अनेक व्यक्ती, संघटनांनी विविध प्रकारे मदतकार्य केलेले आहे, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमात डॉ.अंकुश आगलावे, अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करीत, केवळ पुरस्कारावर न थांबता अखंड सेवा करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी आभार अध्यक्ष विशाल शर्मा यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवक सेवाभावी संस्थेच्या सचिव रंजना शर्मा, रजनीताई दरेकर, सुनिता कसबे, दिपाली पुराणिक, स्वाभिमानी महिला आघाडीच्या प्रदेश संघटक कल्पना सोनार, चेतन पणेर, किशोर पाटील, मंदाताई पडवेकर, सुशील अग्रवाल, गोविंद पाटील, ज्योती राणे, सोनल कपोते, मयूर बारी आदींनी परिश्रम घेतले.

यांचा झाला सन्मान

के-हाळ्याचे पोलीस पाटील वर्षा पाटील, जळगावचे माधुरी कुलकर्णी, रेखा कुळकर्णी,डॉ.गोविंद तापडिया, वैशाली कुळकर्णी, तुषार वाघूळदे, मोहन तिवारी, शैलेंद्र ठाकूर, रजनीकांत पाटील, किशोर पाटील, हभप सरला महाराज वाघ, गायत्री सोनवणे, चिन्मय जगताप, शरद भालेराव, मीनाक्षी पाठक, सागर सपकाळे, दीपक वाल्हे, ऍड.सीमा जाधव,ऋतुजा संत, वंदना मनोज पवार,धुळे येथील दिपाली चौधरी, मीना भोसले, प्रभा परदेशी, कविता कोळी, नाशिक येथील रमेश चेवले, यावल येथील अविनाश घारु, सावदा येथील गजाला शेख, हुस्नोद्दीन शेख, बुलढाणा येथील वर्षा इंगळे, चोपडा येथील पुष्पा राजपूत, पुणे येथील मैत्रेयी ग्राहक भांडार, रजनी दरेकर, चाळीसगाव येथिल विजय शर्मा, बीड येथील आशा ढाकणे, राहुरीच्या दीपाली पुराणिक, सटाणाचे अपर्णा येवलकर, वाशीम येथील प्रवीण पट्टेबहाद्दूर, जामनेर येथील रवींद्र सूर्यवंशी, उज्ज्वला चौरे यांचा ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button