⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

तर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या… !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिम येथील पोहरादेवीचं दर्शन घेत ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली.यावेळी ते म्हणाले की, आता राज्यात फोडाफोडीचे धंदे चाललेत. त्यावेळी माझं आणि अमित शाहांच जे ठरल होत ते झाल असत तर आज भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी कितीही नाही म्हणो, मी शिवाजी पार्क वर आई-वडिलांची शपथ घेऊन बोललो होतो, आज पोहरादेवीची शपथ घेऊन बोलतो, की जे ठरलं होतं त्याच्यामध्ये अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री हे ठरल्याप्रमाणे केलं असतं, तर आज भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना इतर पक्षांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या,

आज ज्येष्ठ भाजपचे नेते आहेत, ज्यांनी भाजपसाठी खस्ता खाल्ल्या ते बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईमध्ये लागला आहेत, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.