म्हणून प्रत्येकाने वाचावे विष्णुसहस्रनाम
जळगाव लाईव्ह न्युज । Vishnu Sahastranam । प्रत्येका आठवड्यातील गुरुवार हा भगवान विष्णू यांचा वार म्हणून ओळखला जातो. म्हणून प्रत्येकाने या दिवशी विष्णू सहस्रनाम वाचावे असे म्हटले जाते. यामुळे आयुष्यात आणि जीवनात सुखसमृद्धी येते. संपूर्ण कुटुंबाच्या शारीरिक व मानसिक शुद्धतेसाठी विष्णुसहस्त्रनामाचे पठण एक उत्तम पर्याय आहे.
धार्मिक ग्रंथानुसार विष्णुसहस्त्रनामाचे विशेष पठाण किंबहुना त्याची पूजा केल्यानंतर घरात सुख समृद्धी येते. भौतिक सर्व सुविधा कुटुंबाला मिळतात. आजूबाजूचा अशुभ प्रभाव कमी होतो. मन एकाग्रह होत. तणाव दूर होतो. माणसाची भीती कमी होते. आत्मविश्वास बलावतो आणि विश्वासही वाढतो. स्वतःचे ध्येय सिद्ध करण्यासाठी शक्ती मिळते. घराला सौभाग्य प्राप्त होतं. तसेच आर्थिक स्थिती ही सक्षम होते.यामुळे नागरिकांनी विष्णु सहस्रनामाचे पठण केले पाहिजे
हे आहेत फायदे
माणसाची भीती कमी होते
सर्व भौतिक सुविधा पूर्ण होतात
आर्थिक स्थिती सक्षम होते
सर्व भौतिक सुविधा पूर्ण होतात
घरात सुख-समृद्धी येते
मन एकाग्र होते
तणाव दूर होतो
असे करा पठण
सूर्योदयाच्या वेळी केले तर उत्तम
शरीर आणि मन दोन्ही शुद्धतेची विशेष काळजी घ्या
गुरुवारी पठण करण्यास सुरू करा
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आवाहन करून पाठ सुरू करा
पाठ सुरू करण्यापूर्वी कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा
विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी पिवळे कपडे घाला