⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

तर भाजपाचीही काँग्रेस होईल; असे का म्हणले देवेंद्र फडणवीस ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ फेब्रुवारी २०२३ । २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला जिंकायची सवय लागली आहे. मात्र आपण एक जरी निवडणूक हरलो तर आपल्याला आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा आपली काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही.आपल्या डोक्यात नेतृत्वाची हवा गेली तर आपली काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, हे गांभिर्याने घेतले पाहिजे. असे भाजपचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस म्हणाले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप आज येथे झाला. अयावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर बावकुळे होते. यावेळी आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी महाअभियान राबविण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबोरबर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरु असलेल्या भव्य योजना व कामकाज सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

हिदुत्व व प्रखर राष्ट्रवाद हे भाजपचे ब्रीद आहे. ते घेऊनच यापुढे आपल्याला वाटचाल करायची आहे. त्यासाठी पुढील दिड ते दोन वर्षे आपल्याला पक्षाच्या विस्तारासाठी परिश्रम करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाने आपला वेळ द्यावा. त्यातून भाजप निश्चितच राज्यात आपले सरकार स्थापन करेल, यात मला शंका वाटत नाही.असेही फडणवीस म्हणाले.