⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि २० ते २४ फेब्रुवारी पर्यंंत उल्हास २के२४ स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले आहे. दि.२० रोजी या स्नेहसंमेलनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. ललिता पाटील (स्नेहसंमेलन समन्वयक), प्रा. स्वप्निल महाजन (स्नेहसंमेलन समन्वयक) सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी बॉलीवूड डे, ट्रॅडिशनल डे चे आयोजन करण्यात आले होते.

बॉलीवूड डे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव परिधान करत मनोरंजन केले. दुसर्‍या सत्रात ट्रॅडिशनल डे व मिस मॅच डे यामध्ये विद्यार्थ्यांनी मंचावर सादरीकरण केले. बॉलीवूड डे समन्वयक प्रा. मयूर ठाकूर बॉलीवूड डे पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. तृषाली शिंपी बॉलीवूड डे विजेते प्रथम – खुशबू पिसाळकर द्वितीय – तोशिका चौधरी तृतीय – किशोर जाधव ट्रॅडिशनल/मिस मॅच डे समन्वयक प्रा. तृषाली शिंपी प्रा. रूपाली चौधरी ट्रॅडिशनल/मिस मॅच डे पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. निलेश वाणी ट्रॅडिशनल डे विजेते प्रथम गणेश राज पाटील व मयूर माळी द्वितीय दीक्षा रामराजे मिस मॅच डे विजेता प्रथम भाविका महाले व वैष्णवी सोनवणे द्वितीय मेघा सोनवणे व ग्रुप बॉलीवूड डे चे सूत्रसंचालन निलाक्षी बर्डे, हेमांगी बावा, प्रितिका तळेले, ग्रीष्मा पाटील या विद्यार्थिनींनी केले. तसेच ट्रॅडिशनल डे चे सूत्रसंचालन कलश किनगे, गायत्री पाटील, सानिका कासार व मूर्तीज परदेशी या विद्यार्थ्यांनी केले.गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सदस्य महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थी वर्ग यांचे कौतुक केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.