डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये ‘स्नेहन व स्वेदन’ उपचार सुविधा सुरू

जून 18, 2026 4:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । बदलती जीवनशैली, वाढते शारीरिक श्रम आणि चुकीच्या बसण्याच्या सवयींमुळे आज अनेक नागरिक सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सायटिका, स्पॉन्डिलायटिस तसेच स्नायूंच्या ताणाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. अशा विकारांवर आयुर्वेदातील स्नेहन व स्वेदन हे उपचार प्रभावी ठरत असून आता ही सुविधा जळगाव खुर्द येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

Snehan and Swedan treatment

आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांपूर्वी शरीराची योग्य तयारी करण्यासाठी स्नेहन व स्वेदन उपचारांना विशेष महत्त्व आहे. स्नेहन प्रक्रियेमध्ये औषधी तेलांचा वापर करून शरीराला अभ्यंग दिला जातो, तर स्वेदन प्रक्रियेद्वारे शरीराला उष्णता देऊन स्नायू व सांधे शिथिल केले जातात. या संयुक्त उपचारामुळे शरीरातील कडकपणा कमी होऊन वेदनांपासून आराम मिळण्यास मदत होते.तज्ज्ञांच्या मते, स्नेहन व स्वेदन उपचारांमुळे शरीर हलके, उत्साही आणि स्फूर्तीदायक वाटते. सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, वातविकार, सायटिका तसेच स्नायूंचा ताण यामध्ये हे उपचार विशेष लाभदायक ठरतात.

नियमित उपचारांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि दैनंदिन कामकाज अधिक सहजतेने करता येते. रुग्णालयात अनुभवी आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार सुरक्षितपणे केले जात असून प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार उपचार पद्धती निश्चित केली जाते. नैसर्गिक पद्धतीने शरीराला आराम, स्फूर्ती व नवचैतन्य देणारे हे उपचार अनेक रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत.सांधेदुखी, कंबरदुखी, मानदुखी किंवा वातविकारांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्नेहन व स्वेदन उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क :मोहित येवले – ८८८८१३१६१९ यांच्याशी संपर्क साधावा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now